डॉ. आंबेडकरांचा ‘बौद्धवाद’ सर्व प्रकारच्या वर्चस्ववादी शक्तींना विरोध दर्शवणारा असून सामाजिक व्यवस्थेसाठी न्याय आणि विवेक ही मूल्ये अति महत्त्वाची मानतो
आंबेडकर म्हणाले होते की, ‘दलित आणि दरिद्री जनतेला या देशात ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही या दोन संकटांशी सतत झगडावे लागणार आहे.’ अलीकडच्या काळात तर या दोन आपत्ती अधिकच प्रखर होत जाताना दिसत आहेत. स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांसमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आणि दलितांच्या लढ्याचे नेतृत्व करण्याचे कार्य आंबेडकरांनी केले.......